आजची वात्रटिका
-------------------------
गद्दारनामा
फक्त एवढेच नाही की,
असे काही मतदार म्हणू लागले.
आज-काल गद्दारही,
दुसऱ्यांना गद्दार म्हणू लागले.
गद्दारच गद्दारांना सांगू लागले,
निष्ठाबिष्ठा काय असू शकते?
याच्यापेक्षा भयानक,
निष्ठेची चेष्टा काय असू शकते?
गद्दारीचे नवे नवे स्वरूप,
राजकीय पटलावर आले आहे!
पिसाळ आणि खोपडे यांनाही,
नव्याने इतिहास जमा केले आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8515
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27मार्च2024
No comments:
Post a Comment