Saturday, July 15, 2023

भूमिकांतराची सर्कस...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भूमिकांतराची सर्कस

कालच्या आपल्याच भूमिकांनी,
आज तेच उघडे होऊ लागले.
आपल्याच बेगडेपणामुळे,
आज तेच नागडे होऊ लागले.

कालच्याच आपल्या भूमिकांची,
आज नव्या भूमिकेत मांडणी आहे.
जुन्याच त्या दळणाची,
आज नव्या जात्यात कांडणी आहे.

आपल्या कोलांटउड्या प्रतिपादताना,
आज त्यांचीच पुन्हा कसरत आहे !
सारी राजकीय सर्कस सांभाळताना,
त्यांचीच विश्वासार्हता घसरत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6863
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
15जुलै2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...