आजची वात्रटिका
-------------------------
आरोपांचे घोडे
इतरांच्या भ्रष्टाचाराची भाषा आहे.
इतरांच्या भ्रष्टाचाराचाच,
सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांकडून हश्या आहे.
एक एक भ्रष्टाचारी म्हणजे,
भ्रष्टाचारातला पक्का वल्ली आहे.
अशा सगळ्या वल्लींकडूनच,
एकमेकांची जोरदार खिल्ली आहे.
जे ते मोठमोठ्याने खिदळत आहेत,
नवे आरोप कानावर आदळत आहेत !
रोज एकमेकांवर आरोप लावत,
त्यांचे घोडे बेफाम उधळत आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6858
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
10जुलै2023

No comments:
Post a Comment