Wednesday, July 19, 2023

आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत....

आजची वात्रटिका
-------------------------
*आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत*
काही न्हाणीघरात नंगे आहेत,
काही कपड्याच्या आत नंगे आहेत.
अशा सगळ्या नागव्यांकडूनच,
आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत.
कुणाचे हातोहात हात स्वच्छ,
कुणाचे हात अजूनही रंगे आहेत.
उजव्या आणि डाव्या हातांकडूनही,
आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत.
ठरवून त्यांना त्यांना नंगे करतात,
ज्यांचे ज्यांचे नंग्याशीच पंगे आहेत.
अशा सगळ्या नंग्या - पुंग्यांचेचच,
आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत.
बघा दिसते का मधाळ फूल कुठे?
हे शोधणारे सारेच भुंगे आहेत.
पाठीशी भुंगा लागलेल्याकडूनही,
आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत.
कुणा कुणाच्या वांग्याचे झाले भरीत,
कुणा कुणाचे वासलेले वांगे आहेत !
देठाला काटे टोचलेल्यांकडूनच,
आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6866
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
19जुलै2023
-----------------------------

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...