Saturday, July 29, 2023

बंडाची प्रेरणा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बंडाची प्रेरणा

आमच्यात या;नसतात तुरुंगात जा,
असे भाजपाकडून ऑप्शन आहे.
म्हणूनच बळजबरीच्या रामरामाला,
आजकाल बंड नावाची कॅप्शन आहे.

आजकालचे एक तरी बंड दाखवा,
जे आतल्या आवाजातून सुचले आहे.
बंडखोरांचे एक मात्र चांगले झाले,
ब्रह्मचर्यासोबत गाढवही वाचले आहे.

वाचलो बुवा एकदाचे,
अशीच बंडखोरणांची धारणा आहे !
त्यामुळेच जुन्या बंडखोरांची,
नव्या बंडखोरांना बंडाची प्रेरणा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6877
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
29जुलै2023
 

No comments:

daily vatratika...29jane2026