Friday, July 14, 2023

बॅनर आणि फोटोलॉजी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बॅनर आणि फोटोलॉजी

आजकालचा राजकीय मंत्रच,
' चलो फुटो आणि खेटो' आहे
म्हणूनच कुणाच्याही बॅनरवर,
आजकाल कुणाच्याही फोटो आहे.

बॅनरवरच्या फोटोंची,
जरा अजबच फोटोलॉजी आहे.
बॅनरवरच्या फोटोकडे नीट बघा,
तिथे आजी आणि माजी आहे.

पाहिजे त्यांचेही टाकीत आहेत,
नको म्हणणाराचेही टाकीत आहेत!
जणू भूतकाळाच्या छायेखाली,
आपला वर्तमानच झाकीत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-8302
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
14जुलै जून2023
 

No comments:

daily vatratika...3april2025