Tuesday, July 4, 2023

राजकीय स्थित्यंतर....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय स्थित्यंतर

काल जे जेलकरी वाटत होते,
तेच आज सत्तेची झेलकरी झाले.
स्वाभिमानाची भाषा करणरेच,
अचानक माना डोलकरी झाले.

ज्यांनी केले आरोपावर आरोप,
त्यांनीच क्लीन चिट दिली आहे.
आता नेमके हेच कळेना,
कुणाची पंचाईत झाली आहे?

कुणी कितीही दाबले तरी,
एक सत्य बाहेर आले आहे !
आता त्यांच्याच प्रश्नांनी,
त्यांनाच अनुत्तरीत केले आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8294
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
4जुलै जून2023
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...