आजची वात्रटिका
-------------------------
सीमा हैदर इफेक्ट
प्रेमासाठी हैदरने सीमा ओलांडताच,
भारतात नवीनच विचार घोळू लागले.
पोरांनी सगळे खेळ दिले सोडून,
आता सगळेच पब्जी खेळू लागले.
पब्जीला आले पुन्हा चांगले दिवस,
काळया चिमण्यांनी तर,
सुटकेचा निःश्वास सोडला आहे !
एवढा सगळा चमत्कार,
सीमा हैदर प्रकरणाने घडला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6869
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
22जुलै2023

No comments:
Post a Comment