Monday, July 3, 2023

महाराष्ट्राचे मनोगत...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

महाराष्ट्राचे मनोगत

तुमच्याप्रमाणे मलाही धक्के बसले,
त्यातून मी कधीच बाहेर आलो आहे.
अगदी अनुभवाने तुम्हाला सांगतो,
मी तर केव्हाच शॉकप्रूफ झालो आहे.

कुणात सह्याद्रीला हादारविण्याचा,
नक्की माज असेल पण शक्ती नाही.
तो महाराष्ट्रभक्त असूच शकत नाही,
ज्याची आपल्या रक्तावरच भक्ती नाही.

कुठल्याही कंडाळ्या आणि बंडाळ्या,
ही गोष्ट किरकोळ आणि साधी आहे !
तुमच्याच विश्वास आणि सुजाणतेवर,
मी नेहमीच पक्का आशावादी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6851
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
3जुलै2023
 

No comments:

daily vatratika...3april2025