Friday, July 21, 2023

निसर्गाची दरडावणी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

निसर्गाची दरडावणी

निसर्गाचा तोल ढासळला की,
दरडीखाली गावे गुडुप होतात.
निसर्गाच्या एका कृतीपुढे,
गप्पेबाजही चिडीचूप होतात.

निसर्गावर अपकार करीत,
जेवढा माणूस निर्ढावतो आहे.
तेवढा निसर्ग माणसाला,
शिक्षा देत देत दरडावतो आहे.

जणू निसर्ग इच्छा नसतानाही,
एकाचा सूड दुसऱ्यावर घेतो आहे !
निसर्गशत्रूंच्या मूर्खपणामूळे,
निसर्गपूजकांचा बळी जातो आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6869
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
21जुलै2023
 

No comments:

फूट आणि विलीनीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- फूट आणि विलीनीकरण फुटीनंतर विलीनीकरण असते, विलीनीकरणानंतर फूट असते. तरीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत,...