Friday, July 14, 2023

लिंबू टिंबू आणि बांबू....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

लिंबू टिंबू आणि बांबू

आपले लिंबू टिंबूपण,
लिंबू टिंबूंना झोंबू लागले.
आधी लागल्या मिरच्या,
आता उपेक्षेचे बांबू लागले.

राजकीय अस्थिरता,
लिंबू टिंबूसाठी संधी असते.
सगळे स्थिरस्थावर झाले की,
स्वप्नांचीही नसबंदी असते.

लिंबू टिंबूचा येडबंबूपणा,
मान्यसुद्धा केला जातो !
एकदा महत्व संपले की,
मग कडू डोस दिला जातो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6862
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
14जुलै2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका9मे2024....वर्ष- तिसरे..अंक -337 वा

दैनिक वात्रटिका 9मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -337 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1YKcJAplgFQ_Yy4Y-iGAd4-zID...