Saturday, July 15, 2023

चांदोमामा आहे साक्षीला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
चांदोमामा आहे साक्षीला...
आपल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांची,
खूपच अजब करणी आहे.
चांद्रयान 3 ची प्रतिकृती,
थेट बालाजीच्या चरणी आहे.
वैयक्तिक श्रद्धा समजू शकते,
पण हे तर 'नॅशनल मिशन' आहे.
आपल्याच वैज्ञानिक दृष्टिकोनाचे,
वैज्ञानिकांकडूनच शोषण आहे
ना कुणाच्या श्रद्धेला विरोध,
ना कुणाच्या अंधश्रद्धेचा पक्ष आहे !
भारतीय संविधानाच्या अपमानाला,
आपल्या चांदोमामाची साक्ष आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
15जुलै जून2023

 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...