Friday, July 28, 2023

पारंपरिक संघर्ष...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पारंपरिक संघर्ष

काका - पुतण्याच्या मतभेदाने,
राजकारणाला ग्रासलेले आहे.
कधी काकाने पुतण्याला तर,
पुतण्याने काकाला त्रासलेले आहे.

जिथे कुठे पुतण्या आणि काका,
तिथे राजकीय प्रसंग बाका आहे.
दोघांचाही एकमेकांना,
अगदी हमखासच धोका आहे.

इतिहासापासून वर्तमानापर्यंत,
याचे दाखलेच दाखले आहेत !
इतिहासाची पुनरावृत्ती करायला,
भविष्यानेही पावलं टाकले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6875
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
28जुलै2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...