Tuesday, July 18, 2023

गटशाही जिंदाबाद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गटशाही जिंदाबाद

पक्षातल्या गटा-तटाचे,
बघा केवढे वट आहेत.
जसे सत्तेमध्ये पक्ष आहेत,
तसे सत्तेमध्ये गट आहेत.

लोकशाहीला फाटा देत,
गटशाही बोकाळते आहे.
लोकशाहीची गळचेपी बघून,
गटशाही चेकाळते आहे.

जसे आपलेच दात आहेत,
तसे आपलेच ओठ आहेत !!
गटशाहीकडून लोकशाहीच्या,
थेट गळ्याचेच घोट आहेत !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6866
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
18जुलै2023
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...