Tuesday, July 11, 2023

टोमॅटोचा रेड सिग्नल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

टोमॅटोचा रेड सिग्नल

कालचा आपला लाल चिखल बघून,
टोमॅटो आज लालेलाल झाले आहेत.
कवडी मोलाने घेणाऱ्या ग्राहकांचे,
आज सर्वात जास्त हाल झाले आहेत.

कधी कधी त्याचेही दिवस येतात,
जो कुणी जरा जास्तच नाशवंत आहे.
शेतकऱ्यांनाही चांगले दिवस येतील,
शेतकऱ्याच्या दुःखाला कुठे अंत आहे?

बचेंगे तो और भी बढेंगे....
टोमॅटोचा बाजाराला हिसका आहे !
ज्यांनी केले टोमॅटोचे अवमूल्यन,
त्यांना आता टोमॅटोचाच धसका आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8300
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11जुलै जून2023
 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...