Tuesday, July 11, 2023

ज्यांची त्यांची व्याख्या....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

ज्यांची त्यांची व्याख्या

आपले ते त्रिशूळ आहे,
दुसऱ्याचे ते तीन चाकी आहे.
याच्यापेक्षा सरकारची व्याख्या,
दुसरी काय करणे बाकी आहे?

इंजिनाच्या भाषेत बोलल्यास,
इंजिन डबल नाही; टिबल आहे.
एक फुल; दोन हाफ,
हे तर अगदी नवीनच लेबल आहे.

कालच्या त्यांच्या सरकारी व्याख्या,
आज एकदमच शिळ्या आहेत !
आता तर दोन-दोन अलीबाबा,
40- 40 च्या दोन टोळ्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6859
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
11जुलै2023
 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...