Wednesday, September 4, 2019

टोकदार विचार

आजची वात्रटिका
----------------------------------------
टोकदार विचार
उपास तापास करून
हवा तसा नवरा मिळत नाही.
शिकल्या- सवरलेल्यांनासुद्धा,
साधे एव्हढेसुद्धा कळत नाही.
असेच झाले असते तर,
सगळे संसार सुखी झाले असते !
माझ्या जागी दुसरी असती तर...
एवढे टोकाला कोण गेले असते?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7057
दैनिक झुंजार नेता
4सप्टेंबर2019

No comments:

निर्धार पक्का !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...