Wednesday, December 16, 2009

ज्याची त्याची हिटलिस्ट

***** आजची वात्रटिका *****
***********************

ज्याची त्याची हिटलिस्ट

ज्याने त्याने आपल्या मनात
क्रमवारी लावलेली असते.
आपापली हिटलिस्ट
तयार करून ठेवलेली असते.

कोणाकडेच हिटलिस्ट नाही
असे गृहीत धरता येणार नाही !
सर्वांची अडचण अशी की,
ती जगजाहिर करता येणार नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

टक्क्यांची कुजबुज.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- टक्क्यांची कुजबुज दहावीचा निकाल बघून, सुरुवात धक्क्यावर धक्क्यांना. तरीही सगळे स्पोर्टली घेऊ टक्के...