Sunday, October 18, 2009

लक्ष्मीपूजन

***** आजची वात्रटिका *****
**********************

लक्ष्मीपूजन

बारा महिने,तेरा त्रिकाळ
लक्ष्मीलाच भजले जाते.
मुहूर्त असो वा नसो
लक्ष्मीलाच पूजले जाते.

लक्ष्मी हे काही
साधेसुधे दैवत नाही !
सरस्वतीही लक्ष्मीशिवाय
आजकाल पावत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

कोरोना आर्ट

आजची वात्रटिका ---------------------------- कोरोना आर्ट कोरोनाची फक्त भीती नाही, आता तर त्याचा वीट आहे. तरीही त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट आत...