Saturday, October 31, 2009

१३ मेरा साथ

***** आजची वात्रटिका *****
**********************

१३ मेरा साथ

महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे
प्रयत्न जणू भावले गेले.
कुठे रूळावर,कुठे मुळावर
रेल्वे इंजिन धावले गेले.

कुणाचा चेहरा काळवंडलेला,
कुणाचा चेहरा तेज:पुंज आहे !
मातोश्रीकडून आबाळ होताच
सांभाळण्यासाठी कृष्णकुंज आहे !!

-सूर्यकांत डॊळसे, पाटोदा (बीड)

1 comment:

vidyadharbp said...

'manase' daad dyaavishi vaatate!

दैनिक वात्रटिका l 4 मे 2026...वर्ष- पाचवे ...अंक -251 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...