Monday, October 5, 2009

राजकीय भूमिका

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय भूमिका

राजकीय पटलावरती
अशा काही भूमिका घ्याव्या लागतात.
काल ज्यांना शिव्या दिल्या
आज त्यांच्याच ओव्या गाव्या लागतात.

राजकीय मूर्खपणाही मग
मोठ्या दिमाखात सादर केला जातो !
राजकीय दारिद्र्य फिटण्यासाठी
नवा गॉडफादर केला जातो !!

-सूर्यकांत डॊळस,पाटोदा (बीड)

1 comment:

अमोल केळकर said...

अतीशय छान ब्लॉग तयार केला आहे. तसेच सर्वच वात्रटीका उत्तम जमल्या आहेत.

अभिनंदन

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...