Thursday, October 8, 2009

नक्षलवादी मित्रांनो.....

***** आजची वात्रटिका*****
*********************


नक्षलवादी मित्रांनो.....

निष्पाप माणसं मारून
कधीच क्रांती होत नाही.
रक्ताची चटक लागली की,
मन:शांती होत नाही.

फक्त बंदुकीची गोळीच
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नाही !
कळतेच पण वळेना
तुमचे काळीज पत्थर नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

1 comment:

sharayu said...

नक्षलवादी व माओवादी या संघटना त्या त्या प्रदेशांतील चोरटे धंदे चालविणार्यानी आपल्या धंद्यांच्या संरक्षणासाठी निर्माण केल्या आहेत.

पक्षांतराचे भविष्य ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- पक्षांतराचे भविष्य फोडाफोडी आणि ओढाओढी, हे तर सगळे चालूच आहे. दुसरीकडे गेल्यावरतीही, तिसरीकडची लालूच आहे...