Monday, September 21, 2009

आंधळे प्रेम

***** आजची वात्रटिका ****
********************

आंधळे प्रेम

लोकांची ती घराणेशाही
आपली ती लोकशाही होते.
लेकरांना पुढे करण्याची
ज्याला त्याला घाई होते.

लोकशाहीच्या नावाखाली
आपल्या रक्ताला संधी असते !
ज्याच्या त्याच्या डोळ्यांवरती
पितृप्रेमाची धुंदी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...