Sunday, September 27, 2009

चंद्रावर पाणी !

****** आजची वात्रटिका ******
***********************

चंद्रावर पाणी !

विज्ञानाच्या प्रगतीशीलतेची
ही एक नवी कहाणी आहे.
त्यांनी हे समजून घ्यावे,
ज्यांच्या डोक्यातच पाणी आहे.

टॅंकर सम्राटांचे डोके चालले
आता खोर्‍याने पैसा ऒढता येईल !
यापुढे टॅंकरचे बिल तर
थेट चंद्रापासून काढता येईल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

काटकसरी व्हा !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- काटकसरी व्हा ! इंधन काटकसरीचा मार्ग, आपल्यासाठी खूप सोपा आहे. तुमच्या आमच्या मागे पुढे, कुठे वाहना...