***** आजची वात्रटिका *****
********************************
कपड्यांचे कुर्बान
पोस्टरवरुनच प्रश्न पडतो
पुढून कसे दिसत असेल?
जशी ज्याची नजर आहे
त्याला तसे दिसत असेल.
आपण बघतो;त्या दाखवतात,
लज्जेने नजर चोरली पाहिजे !
करिनाच्या उघड्या पाठीवर
कौतुकाची थाप मारली पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
1 comment:
छान आहेत आपल्या वात्रटिका! सगळ्याच आवडल्या.पुढील कारकिर्दीकरिता शुभेच्छा !
’वात्रटिका’ हा काव्यप्रकार हिंदीतील ’व्यंग्य कविता’च्याच समकक्ष आहे ना? मला तसे साम्य जाणवले आणि वात्रटिका हा शब्द माहित नव्हता म्हणून.(जरी मी कित्येक वर्षांपासून मराठी दैनिकांमधे विविध नावांखाली अशा कविता वाचत आलोय तरी.)
Post a Comment