Sunday, November 1, 2009

भक्तीपुराण

***** आजची वात्रटिका *****
**********************

भक्तीपुराण

राजकारण्यांना नेहमीच
मागे कुणी तरी उभा लागतो.
अध्यात्माचे सोंग आणण्यासाठी
मागे कुणी तरी बाबा लागतो.


जेवढे भक्त मोठे,
तेवढा गुरु मोठा होत जातो.
भोवती पाळीव प्राणी जमताच
मठाचाही गोठा होत जातो.

आंधळे भक्त,आंधळी भक्ती
मेंदूचीही जागा मोकळी होते !
हवेतून आंगठीच काय ?
थेट सोन्याची साखळी येते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

Vinanti said...

मस्त कविता केलीत आपण...

दैनिक वात्रटिका l 3 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 184 वा l पाने -42

दैनिक वात्रटिका l 3 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 184 वा l पाने -42 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Elm-bAY7vNSQzSIn_iX...