Friday, February 14, 2020

प्रेमसूत्र

आजची वात्रटिका
----------------------------------------
प्रेमळ सल्ला
ज्याला जिंकता जिंकता
दुसऱ्यासाठी हारता येते.
तोच खरा भाग्यवंत,
त्यालाच खरे प्रेम करता येते.
प्रेम म्हणजे सहजीवन,
जे एकट्याच्या मनावर नाही.
प्रेमाने जनावराचा माणूस व्हावा,
माणसाचे जनावर नाही.
प्रेम म्हणजे जाळणे नाही,
प्रेम म्हणजे जळणे आहे.
कुणाकुणाचा गैरसमज होतो,
प्रेम म्हणजे खेळणे आहे.
ना हिशोब,ना व्यवहार,
प्रेम निरागस मूल आहे !
प्रेम म्हणजे कठोर तपश्चर्या,
प्रेम उंबराचे फुल आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5715
दैनिक पुण्यनगरी
14फेब्रुवारी 2020

No comments:

कोरोना तह