आजची वात्रटिका
---------------------
घोटाळ्यांचा बेंडबाजा
घोटाळ्यावर घोटाळे,
घोटाळ्यांना भरती आहे.
कुणाचे झाले स्वप्नभंग,
कुणाची मात्र स्वप्नपूर्ती आहे.
घोटाळ्यांचे घोटाळ्यांशी,
अनैतिक असे नाते आहे.
घोटाळेबहाद्दर बघून,
अक्कल पेंड खाते आहे.
आपला खाऊ,सगळे खाऊ,
आपल्याच बापाची पेंड आहे!
प्रत्येक घोटाळा म्हणजे,
जणू ठसठसते बेंड आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6553
दैनिक पुण्यनगरी
9ऑगस्ट2022
No comments:
Post a Comment