Thursday, August 4, 2022

कसं काय पाटील?... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका

---------------------

कसं काय पाटील?

किती खरे? किती खोटे?
हे उपरवालाच जाने,
शेजारच्या गावामध्ये,
काल ईडी येऊन गेली म्हणे.

सरपंच म्हणाला पाटलाला,
कसं काय पाटील बरं हाय का?
काल ईडी येऊन गेली म्हणे,
सांगा ऐकलं ते खरं हाय का ?

व्हय आलती आलती,
माझी बी पातळ झालती !
पण चायनलवाले दिसले नाहीत,
आली तशी परत गेलती !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6546
दैनिक पुण्यनगरी
4 ऑगस्ट2022

 

No comments:

daily vatratika...29jane2026