Saturday, August 6, 2022

जळकट सत्य... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

जळकट सत्य

द्वेषाने द्वेष वाढतो,
हा केवळ शाब्दिक श्लेष नाही.
ज्यांना याचा अनुभव नाही,
त्यांना कसलाही क्लेश नाही.

जो जळतो ढणाढणा,
तोच इतरांचा द्वेष करू शकतो!
तुमच्या अनुभवात भर म्हणून,
कुणीही पुरावे पेश करू शकतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8005
दैनिक झुंजार नेता
6ऑगस्ट2022

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...