आजची वात्रटिका
---------------------
बैल महात्म्य
अंगावर कसल्या कसल्या झुली,
नकात वेसन,तोंडात बोळा असतो.
एकदा बैल होऊन जगले की,
वाट्याला दररोज पोळा असतो.
गरीब गाय होवून जगण्यापेक्षा,
दावणीचा बैल होण्यात मजा आहे !
फक्त एक गोष्ट विसरायची,
आपल्या डोक्यात भेजा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक वात्रटिका
26ऑगस्ट2022
No comments:
Post a Comment