Friday, August 5, 2022

अमृतमय नारा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

अमृतमय नारा

काल तहान वेगळी होती,
आज वेगळीच तहान आहे.
स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव
दणक्यात म्हणाला होता,
मेरा भारत महान आहे.

ट्रक आणि टेम्पोच्या मागे,
सुवर्ण महोत्सवाची साक्ष आहे.
हर घर तिरंगा,
अमृत महोत्सवाचे लक्ष आहे.

फडकू द्या घरोघरी तिरंगा,
तसा तो जगभरही फडकू द्या !
ज्यांना ज्यांना काळीज आहे,
त्यांनी ते देशासाठीही धडक द्या!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6550
दैनिक पुण्यनगरी
5ऑगस्ट2022

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...