Wednesday, August 24, 2022

सारेच चमत्कारिक!... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

सारेच चमत्कारिक!

कुणी आजारी,कुणाची बेजारी,
कुणाच्या पत्रिकेत मंगळ आहे.
शिकलेले तेवढे हुकलेले,
त्यामुळे भोंदूबाबांची चंगळ आहे.

अडला हरी गाढवाचे पाय धरी,
हा तर गाढवपणाचा कळस आहे !
अशिक्षितांपेक्षाही सुशिक्षितांच्या,
बेअकलीपणाचा किळस आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6563
दैनिक पुण्यनगरी
24ऑगस्ट2022

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...