आजची वात्रटिका
---------------------
संधीचा फायदा
सावांनी लावला,लबाडांनी लावला,
आपल्या घरोघरी तिरंगा लावला.
सावांपेक्षा लबाडांनाच,
मोठ्या प्रमाणात तिरंगा पावला.
ज्याने त्याने आपली हौस,
अधिकृतपणे पुरवून घेतली.
सावांबरोबर लबाडांनीही,
आपली देशभक्ती मिरवून घेतली.
साव कर्तव्याला जागले,
लबाडांनी संधीचे सोने केले !
झंडा ऊँचा रहे हमारा.....
लबाडांनी हेच आपले गाणे केले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6559
दैनिक पुण्यनगरी
17ऑगस्ट2022
No comments:
Post a Comment