आजची वात्रटिका
---------------------
हॅलो ss हॅलो...ss
तो म्हणाला, हॅलोss
ती म्हणाली,हॅल ss
दोघांची हॅलो- हॅली बघून,
मीच स्तब्ध झालो.
हॅलो...हॅलो सोडून द्या,
देशभक्तीची संधी आहे.
असे मुळीच नाही की,
कायद्याने हॅलो बंदी आहे.
हॅलोला बंदी नको,
कशाचीही सक्ती नको !
जे करायचे ते मनातून करा,
बोलघेवडी देशभक्ती नको !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6559
दैनिक पुण्यनगरी
18ऑगस्ट2022
No comments:
Post a Comment