Saturday, August 27, 2022

विळा म्हणाला भोपळ्याला... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

विळा म्हणाला
भोपळ्याला

पारंपारिक विचार करणे,
खरोखरच गैर आहे.
आपण आता दाखवून देऊ,
आपले कुठे वैर आहे?

नवा काळ,नवा विचार,
आता काहीही शक्य आहे.
लोकही कबूल करतील.
आपले खरोखर सख्य आहे.

आपली युती झाली तर,
मतभेदावर अडायचे नाही!
आपण मात्र एकमेकांवर,
चुकूनही पडायचे नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6565
दैनिक पुण्यनगरी
27ऑगस्ट2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 243वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 243वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1onWAiM6-oAvD7-Xpbhj...