Wednesday, August 10, 2022

जेन्ट्स लिमिटेड.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

जेन्ट्स लिमिटेड

कुणाला लागली लॉटरी,
कुणाला बढती आहे.
कुणाचे राजकीय पुनर्वसन,
कुणाची झाडाझडती आहे.

कालचे आणि आजचे,
कुणासाठी सेम टू सेम आहे.
एवढ्या रामायणानंतर,
कुणासाठी वेटिंग गेम आहे.

जेन्ट्स लिमिटेडचा,
मंत्रिमंडळावर शिक्का आहे !
चित्रातल्या वाघासाठी मात्र,
नवा राजकीय धक्का आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6554
दैनिक पुण्यनगरी
10ऑगस्ट2022

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...