आजची वात्रटिका
---------------------
समानार्थी शब्द
आज वेगवेगळ्या व्याख्या आहेत.
लोकशाहीचे तोंड दाबून,
आज बुक्क्यांवर बुक्क्या आहेत.
निष्ठावंताएवढेच गद्दारावर,
राजकारणी लुब्ध झाले आहेत !
निष्ठावंत आणि गद्दार,
हे समानार्थी शब्द झाले आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8028
दैनिक झुंजार नेता
31ऑगस्ट2022
No comments:
Post a Comment