आजची वात्रटिका
---------------------
घराणेशाही
घराणेशाही रुजली आहे,
घराणेशाही पूजली आहे.
जिकडे बघावे तिकडे,
घराणेशाही माजली आहे.
लोकशाहीच्या नावाखाली,
घराणेशाही लपली जाते.
राजकीय अनिवार्यता म्हणून,
घराणेशाही थापली जाते.
लोकशाहीच्या भक्तांकडून,
लोकशाहीची उपासना आहे !
लोकशाहीच्या आश्रयाने,
घराणेशाहीची जोपासना आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6559
दैनिक पुण्यनगरी
19ऑगस्ट2022
No comments:
Post a Comment