Tuesday, August 9, 2022

इव्हेंट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

इव्हेंट

इव्हेंट रोगाचा होऊ शकतो,
इव्हेंट योगाचा होऊ शकतो.
इव्हेंट त्यागाचा होऊ शकतो,
इव्हेंट भोगाचा होऊ शकतो.

इव्हेंट दुःखाचा होऊ शकतो,
इव्हेंट सुखाचा होऊ शकतो.
इव्हेंटला काही मर्यादा नाही,
इव्हेंट टोकाचा होऊ शकतो.

विनाकारणाचा होऊ शकतो,
इव्हेंट धोरणाचा होऊ शकतो!
इव्हेंट जिवंतपणाचे लक्षण,
इव्हेंट मरणाचा होवू शकतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8007
दैनिक झुंजार नेता
9ऑगस्ट2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 243वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 243वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1onWAiM6-oAvD7-Xpbhj...