Monday, August 22, 2022

असूरी आनंद... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

असूरी आनंद

राजकीय सत्तेचा गुणधर्मच
जाऊ तिथे खाऊ आहे.
सत्तासूर आणि बकासुर,
एकमेकांचा सख्खा भाऊ आहे.

शंकासूर वाढलेले की,
धोकासूर जन्माला येतात.
धोकासूरांचे जुळे म्हणून,
फेकासूर जन्माला येतात.

बकासुराला ठेकासूर सामील,
खरी आपलीच गलती असते !
सत्त्तासूर माजले की,
खोकासूरांची चलती असते !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6561
दैनिक पुण्यनगरी
22ऑगस्ट2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 243वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 243वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1onWAiM6-oAvD7-Xpbhj...