Tuesday, August 23, 2022

वास्तव .... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

वास्तव

लोकशाहीचा आधारस्तंभ,
इथली घराणेशाही आहे.
आपली मात्र त्याविरुद्ध,
उगीच गाऱ्हाणेशाही आहे.

घराणेशाहीचे महत्त्व,
कुणाला नाकारता येणार नाही.
घराणेशाहीशिवाय लोकशाही,
कधीच स्विकारता येणार नाही.

आपल्यात आणि घराणेशाहीत,
जरी जुनाच विस्तव आहे !
तुमच्या मताचे स्वागत असूनही,
घराणेशाही हे वास्तव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8022
दैनिक झुंजार नेता
23ऑगस्ट2022

 

No comments:

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...