Thursday, August 25, 2022

गुद्दा - गुद्दी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

गुद्दा - गुद्दी

लोकशाहीच्या सभागृहांना,
गुद्दा -गुद्दी काही नवी नाही.
त्याचे कौतुक करीत बसायला,
ही काही ओवी -बिवी नाही.

लोकप्रतिनिधींची गुद्दा - गुद्दी,
एक कळकट वळण देऊन जाते !
लोकशाही बळकट होण्याऐवजी,
लोकशाही मळकट होवून जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
दैनिक वात्रटिका
25ऑगस्ट2022

 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...