आजची वात्रटिका
---------------------
दंभस्फोट
ज्यांनी चढविले वरवर,
तेच खाली खेचू शकतात.
जे घेतात डोक्यावर,
तेच पायाखाली ठेचू शकतात.
जे असे वागू शकतात,
त्यांची आंधळी भक्ती असते !
आंधळेपणा जपण्याची,
सांस्कृतिक सक्ती असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8019
दैनिक झुंजार नेता
20ऑगस्ट2022
No comments:
Post a Comment