Monday, August 29, 2022

आपले गुरुजी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
आपले गुरुजी
शिकविण्यासाठी वेळ मिळावा,
यासाठी शाळांमध्ये टपले गुरुजी.
वर्गा - वर्गाच्या भिंतीवर टांगलेले,
दिसतील बघा आपले गुरुजी.
दांडीबहाद्दरांना राजकीय आडोसा,
सोयीच्या फुटपट्टीने मापले गुरुजी.
हे कुणालाच कसे दिसत नाही?
शाळा सोडून कुठे जुपले गुरुजी?
अपुऱ्या आणि अर्धवट माहितीवर,
साऱ्या अर्धवटरावांनी झापले गुरुजी.
खऱ्या गुणवत्तेची कदर कुणाला?
जरी शिक्षकधर्म साठी रापले गुरुजी.
जरी चोर सुटले, चोर सुटतील,
तरी संन्याशीवृत्तीला जपले गुरुजी!
विद्यार्थ्यांच्या काळजात फ्रेम व्हा,
भविष्यही सांगेल,हे आपले गुरुजी!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6567
दैनिक पुण्यनगरी
29ऑगस्ट2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 243वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 243वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1onWAiM6-oAvD7-Xpbhj...