आजची वात्रटिका
---------------------
प्रगल्भतेचा विचार
नेत्यांचे पक्षांतर म्हणजे,
राजकीय अदान प्रदान असते.
काही जातात,काही येतात,
यावरूनच हे निदान असते.
आपल्याला बसतात धक्के,
राजकीय पक्षांसाठी हे नवे नाही.
पक्षांतराच्या भानगडीत,
कुणीच डावी उजवे नाही.
एवढे बारीक लक्ष नको,
कोण कुठे येते जाते आहे ?
राजकीय पक्षांतरे होतात म्हणजे,
लोकशाही प्रगल्भ होते आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6562
दैनिक पुण्यनगरी
23ऑगस्ट2022
No comments:
Post a Comment