Wednesday, August 31, 2022

मूर्तिमंत उदाहरण.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
मूर्तिमंत उदाहरण
कधी देवाच्या दारात चोरी आहे,
कधी देवाच्या घरात चोरी आहे.
देवाची भीती न वाटणे,
ही तर चोरांची शिरजोरी आहे.
तेंव्हा देव आणि भक्तही,
अगदी हतबल ठरला जातो.
जेंव्हा देवासारखा देवसुद्धा,
थेट मूर्तीसकट चोरला जातो.
देव जळी आहे,स्थळी आहे,
अगदी काष्ठी आणि पाषाणी आहे!
सगुण आणि निर्गुणतेवरही,
आज चोरट्यांचीच निशाणी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6569
दैनिक पुण्यनगरी
31ऑगस्ट2022

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...