आजची वात्रटिका
---------------------
गणेशोत्सव 2022
उंदीर म्हणाला गणपतीला,
बाप्पा,यंदा सगळेच जोरात आहे.
उत्सवांचे महोत्सव तरी,
धडधड मात्र माझ्या उरात आहे.
डॉल्बीचे आवाज ऐकून,
जरी माझे डोके उठते आहे
कोरोनातली शिल्लक हौस,
दोन वर्षांनी तरी फिटते आहे.
उत्साहावर विरजण टाकण्याची,
अजिबातच ही योग्य वेळ नाही !
नोकरीत आरक्षण मिळायला,
मामा,मी दहीहंडीचा खेळ नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6569
दैनिक पुण्यनगरी
1 सप्टेंबर 2022

No comments:
Post a Comment