Wednesday, September 28, 2022

जागते रहो.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

जागते रहो....

आमदार गेले,खासदार गेले,
सोबत कार्यकर्त्यांच्या ताफा गेला.
आता रखवाली कोणी करायची?
जागते रहो... म्हणत थापा गेला.

खरोखरच थापा गेला,
यात मुळीच थापालॉजी नाही !
सैनिक मात्र सैनिकच राहिले,
कोणताही सैनिक माजी नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8053
दैनिक झुंजार नेता
28सप्टेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...