Tuesday, September 6, 2022

इशारा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

इशारा

धोकेबाजांपासून सावधान,
इशारे तसा खूप गंभीर आहेत.
यावरून एक लक्षात येते,
धोकेबाज किती खंबीर आहेत.

सिर्फ इशारा काफी है,
प्रश्न ज्याच्या त्याच्या भेजांचा आहे !
धोकेबाजांपासून सावधान,
हा इशारा महाधोकेबाजांचा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6574
दैनिक पुण्यनगरी
6सप्टेंबर 2022

 



No comments:

daily vatratika...18april2024